बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी नुतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनी मंगळवार, दिनांक 15 ऑगस्ट 2017 रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी दिली.
विजयनगर, सांगली येथील नुतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण होणार आहे. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास खासदार, आमदार, स्थानिक-स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, दलित मित्र, सन्मानित व्यक्ती, महिला, नागरिक, शालेय विद्यार्थी शिक्षक, सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे.
    या समारंभास खासदार, आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, स्वातंत्र्य सैनिक, दलित मित्र पुरस्कृत व्यक्ती, महिला, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक, शालेय विद्यार्थी शिक्षक, सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांना ध्वजारोहणाच्या या मुख्य शासकीय समारंभात उपस्थित राहता यावे म्हणून कोणत्याही कार्यालयाने अथवा संस्थेने त्यांच्या कार्यालयाचे ध्वजारोहण या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत आयोजित करू नये. एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ या दिवशी सकाळी 8.35 च्या पूर्वी किंवा 9.35 च्या नंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला कार्यक्रम पुढीलप्रमाणे.  सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावरील प्रभात फेऱ्या, सकाळी 9.05 वाजता विजयनगर, सांगली येथील नुतन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ.
    ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी 15 मिनिटे आसनस्थ व्हावे सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
                      00000   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा