बुधवार, १५ जुलै, २०२०

बेरोजगार उमेदवारांनी आधार लिंकसह नाव नोंदणी अद्ययावत करावी - सहायक आयुक्त संजय माळी

 सांगली, दि. 15 , (जि. मा. का.) : शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या http://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ज्या बेरोजगार उमेदवारांनी नोकरीसाठी नाव नोंदणी केलेली आहे, त्यांनी आधार लिंकसह आपली नोंदणी अद्ययावत करावी. तसेच मोबाईल नंबर, ई-मेल आयडी सुध्दा अद्ययावत करून नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0233-2600554 वर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा