सोमवार, ६ जानेवारी, २०२०

अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी 100 कोटीहून अधिक अनुदान तालुक्यांना वितरीत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

      -     शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाची मदत
-          मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव कडेगाव तालुक्यांना अनुदान वितरीत

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आपदग्रस्तांना विशेष बाब म्हणून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अतिवृष्टी पुरामुळे जिरायत, बागायत फळ पिकांचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांसाठी 100 कोटी 66 लाख 37 हजार 537 रूपये अनुदान मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव कडेगाव तालुक्यासाठी वितरीत करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीआरएफ निकषानुसार 33 कोटी 38 लाख 7 हजार 296 एसडीआरएफच्या निकषानुसार 67 कोटी 28 लाख 30 हजार 241 रूपये असे एकूण 100 कोटी 66 लाख 37 हजार 537 रूपये अनुदान मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव कडेगाव तालुक्यासाठी वितरीत करण्यात आले आहे.
तालुकानिहाय एनडीआरएफच्या निकषानुसार, एसडीआरएफच्या निकषानुसार   एकूण अनुदान वितरण अनुक्रमे पुढीलप्रमाणे.  मिरज - 10 कोटी 49 लाख 15 हजार 634 रूपये, 21 कोटी 14 लाख 70 हजार 547 रूपये, एकूण 31 कोटी 63 लाख 86 हजार 181 रूपये. वाळवा - 9 कोटी 27 लाख 98 हजार 428 रूपये, 18 कोटी 70 लाख 46 हजार 806 रूपये, एकूण 27 कोटी 98 लाख 45 हजार 234 रूपये.  शिराळा - 4 कोटी 49 लाख 30 हजार 462 रूपये, 9 कोटी 5 लाख 62 हजार 950 रूपये, एकूण 13 कोटी 54 लाख 93 हजार 412 रूपये. पलूस - 7 कोटी 81 लाख 10 हजार 907 रूपये, 15 कोटी 74 लाख 42 हजार 276 रूपये, एकूण 23 कोटी 55 लाख 53 हजार 183 रूपये. तासगाव - 30 लाख 71 हजार 27 रूपये, 61 लाख 90 हजार 38 रूपये, एकूण 92 लाख 61 हजार 65 रूपये.  कडेगाव - 99 लाख 80 हजार 838 रूपये, 2 कोटी 1 लाख 17 हजार 624 रूपये, एकूण 3 कोटी 98 हजार 462 रूपये.
निधी वितरणाच्या बाबतीत संबंधित तहसिलदार यांनी शासन निर्णयाप्रमाणे आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. बँकांकडे तपशीलवार यादीसह पाठविलेली रक्कम सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केल्याबाबतचे कोणतीही रक्कम वाटपाविना शिल्लक नाही असे प्रमाणपत्र बँकांकडून घेण्यात यावे. निधी वाटपानंतर संबंधित तालुक्यांनी रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या रक्कमेच्या माहितीसह तहसिलदार कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा