शुक्रवार, १७ जानेवारी, २०२०

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते जयंत पाटील स्पोर्टस मंडळ संचलित व्यायाम शाळेचे उद्घाटन

सांगली, दि. १७, (जि. मा. का.) : इस्लामपूर मधील निनाईनगर येथे क्रीडांगण विकास अंतर्गत बांधण्यात आलेल्या आणि जयंत पाटील स्पोर्टस मंडळ संचलित व्यायाम शाळेचे  उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले.
     यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम,  खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबूले, जयंत पाटील स्पोर्टसचे संस्थापक खंडेराव जाधव उपस्थित होते.
    या व्यायाम शाळेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पहाणी करून समाधान व्यक्त केले. निनाईनगर येथील नगरपरिषद हद्दितील 2805 चौरस मीटरवर 2 कोटी 12 लाख 56 हजार रूपये खर्चून उभारण्यात आलेल्या व्यायाम शाळेत क्रीडांगण, प्रेक्षागृह गॅलरी, स्वच्छतागृह, कम्पाऊंड वॉल, गार्डन व इलेक्ट्रीक कामे करण्यात आली आहेत. या ठिकाणी दर्जेदार क्रिडा साहित्य ही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा