गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

गावांच्या सवांर्ंगीण विकासाला चालना देवू - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सामान्य माणसाचे हित लक्षात घेवून शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळणे गरजेचे आहे. यासाठी छोट्या मोठ्या वाड्यावस्त्यांवरही पेयजल पाणीपुरवठा योजनांसाठी भरीव निधी दिला जात आहे. या माध्यमातून गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देवू, असे प्रतिपादन कृषि फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
वाळवा तालुक्याील देवर्डे येथे जनुसविधा योजनंेतर्गत बांधण्यात आलेल्या देवर्डे ग्रामपंचायत इमारत विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, माजी मंत्री डॉ. विनयरावजी कोरे, गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे, तालुका कृषि अधिकारी राहुल माने, सरपंच रेखा पाटील, उपसरपंच भाग्यश्री पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, शासन धोरणात्मक निर्णय घेवून अनेक योजना राबवित आहे. जलयुक्त शिवार अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेततळे, उज्वला गॅस योजना, ठिबक अनुदान अशा अनेक कल्याणकारी योजना शासन राबवित आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, ग्रामीण शहरी भागातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका लक्षात घेवून शासन अनेक योजना राबवित आहे. प्रत्येक गावच्या लहान मोठ्या प्रश्नांची जाणीव असून त्या दृष्टीने विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. विकास कामांसाठी भरीव निधी मिळत असून टप्प्याटप्प्याने सर्व कामे पूर्ण करू. उज्वला गॅस योजनेंतर्गत ज्यांच्या घरी गॅस नाही त्यांच्या मागणीनुसार गॅस कनेक्शन दिले जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2022 पर्यंत एकही कुटूंब निवाऱ्यापासून वंचित राहणार नाही. गावामध्ये एकोपा ठेवला पाहिजे तरच गावाचा विकास होतो. शासन चांगल्या योजना राबवित आहे. या योजनांंची माहिती एकमेकांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत लाडेगाव -देवर्डे-चिकुर्डे प्रमुख जिल्हा मार्ग 75 कि.मी. सुधारणे करणे, देवर्डे येथील रस्ते कॉंक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन जलसुविधा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या देवर्डे ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री विनयरावजी कोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सरपंच रेखा पाटील यांनी केले. आभार ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रताप पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास ग्रामसेवक एस. जी अत्तार, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह देवर्डे पंचक्रोशीतल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा