मंगळवार, ३ जुलै, २०१८

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला 157 जादा एस.टी. बसेस धावणार

    सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : आषाढी एकादशीसाठी भाविक मोठ्या संख्येने विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला जात असतात. भाविकांच्या सोयीसाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला सांगली जिल्ह्यातून दिनांक 18 ते 30 जुलै या कालावधीत एकूण 157 बसेस दररोज जादा सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती सांगली विभाग नियंत्रक ए. एस. ताम्हणकर यांनी दिली.
    सांगली जिल्ह्यातून पंढरपूरला नियमित एकूण 38 बसेस पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र परिवहन महामंडळ सांगली विभागातर्फे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातून नियमिती बसेस व्यतिरिक्त एकूण 157 बसेस दररोज जादा सोडण्यात येणार आहेत.
सांगली जिल्ह्यातून पंढरपूरला नियमित जाणाऱ्या एस.टी बसेस कंसात जादा सोडण्यात येणाऱ्या बसेसची आगारनिहाय माहिती पुढीलप्रमाणे. सांगली आगार 3(15), मिरज 12(23), इस्लामपूर 4(8), तासगाव 1(18), विटा 1(20), जत 4(9), आटपाडी 4 (11), कवठेमहांकाळ 4 (15), शिराळा 5 (28) पलूस आगारातून नियमीत एकही बस जात नाही मात्र 10 जादा बसेस दिनांक 18 ते 30 जुलै या कालावधीत सोडण्यात येणार आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा