शनिवार, २१ जुलै, २०१८

जिल्ह्यात खरीपासाठी 692 कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरीत बँकांची कामगिरी उंचावली : 60 टक्के उद्दिष्टपूर्ती

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये जून अखेरपर्यंत केवळ 25 टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपात कामगिरी उंचावण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी वारंवार बँकांच्या बैठका घेवून केलेल्या पाठपुराव्याला यश येवून राष्ट्रीयकृत बँकांची कामगिरी उंचावली आहे. यंदाच्या हंगामात खरीप पिकासाठी बँकांनी एकूण 692 कोटी रूपयाचे पीककर्ज वितरीत केले आहे.
    जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 1149 कोटी 84 लक्ष पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट असून बँकांनी पीक कर्ज वितरणामध्ये अत्यंत संवेदनशील राहून शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. यामध्ये कोणतीही चालढकल सहन केली जाणार नाही अशी भूमिका प्रशासनाने घेवून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला बँकांनीही अत्यंत चांगला प्रतिसाद देत 1149 कोटी 84 लक्ष पीककर्ज वितरणाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 15 जुलै अखेर 82 हजार 629 खातेधारकांना 692 कोटी रूपयांचे पीककर्ज वितरीत केले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे एल. एस. कट्टी यांनी दिली.
    15 जुलै अखेर पीककर्ज वितरणामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या बँका, केलेली कामगिरी कंसात असणारे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक  461 कोटी 95 लाख रूपये (553 कोटी 20 लाख रूपये), बँक ऑफ महाराष्ट्र 40 कोटी 87 लाख रूपये (70 कोटी), बँक ऑफ इंडिया 41 कोटी 5 लाख रूपये (79 कोटी), युनियन बँक ऑफ इंडिया 22 कोटी 86 लाख रूपये (54 कोटी 60 लाख रूपये), बँक ऑफ बरोदा 15 कोटी 18 लाख रूपये (23 कोटी 85 लाख रूपये), देेना बँक 7 कोटी 45 लाख रूपये (8 कोटी 20 लाख रूपये), कॅनरा बँक 7 कोटी 22 लाख रूपये (10 कोटी), कर्नाटका बँक 2 कोटी 28 लाख रूपये (2 कोटी 15 लाख रूपये), ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स 2 कोटी 8 लाख रूपये (52 लाख), सिंडीकेट बँक 1 कोटी 4 लाख रूपये (1 कोटी 85 लाख रूपये).

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा