शनिवार, ७ जुलै, २०१८

उत्सव साजरे करण्यासाठी ऑनलाईन अर्जाव्दारे परवानगी घ्यावी - धर्मादाय उप आयुक्त सुवर्णा खंडेलवाल

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 अंतर्गत दिनांक 01 जुलै 2018 पासून उत्सव (गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती इ.) साजरे करण्यास देण्यात येणारे तात्पुरत्या स्वरुपातील परवाने धर्मादाय संघटनेच्या charity.maharashtra.gov.in या संकेत स्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने देण्यात येणार आहेत. तरी गणपती मंडळांनी संकेतस्थळावरील गर्दी टाळण्यासाठी आतापासूनच ऑनलाईन अर्ज सादर करुन परवानगी घ्यावी, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त सुवर्णा खंडेलवाल यांनी केले आहे.
धर्मादाय उप आयुक्त सुवर्णा खंडेलवाल म्हणाल्या, संकेत स्थळावरील प्रणाली मार्गदर्शकमध्ये कलम 41 परवाने या ठिकाणी जावून माहिती घेवून त्याप्रमाणे अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. परवान्यांसाठीचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली, कृष्णाश्रय कॉम्लेक्स, महावीर नगर, वखारभाग सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2621502 या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा