शनिवार, ७ जुलै, २०१८

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत देण्यात येणाऱ्या शिक्षणासाठीच्या मदतीचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव द्यावेत - धर्मादाय उप आयुक्त सुवर्णा खंडेलवाल

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : राज्यामध्ये ज्या गरीब कुटुंबातील (कमी उत्पन्न असणारे, भांडी घासणारे, अल्पभूधारक असणारे) मुलांमुलींना 10 वी किंवा 12 वी मध्ये 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. परंतु, परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेवू शकत नाहीत, अशा मुला-मुलींना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत शिक्षणासाठी यथायोग्य मदत करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी त्यांचे प्रस्ताव 31 जुलै 2018 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन धर्मादाय उप आयुक्त सुवर्णा खंडेलवाल यांनी केले आहे.
धर्मादाय उप आयुक्त सुवर्णा खंडेलवाल म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुकत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19 जून 2018 रोजी गणपती मंडळांच्या विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील मुला-मुलींनी त्यांचे प्रस्ताव विहित कागदपत्रांसह (अर्ज, गुणपत्रक, पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेची कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला इ.) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली विभाग, कृष्णाश्रय कॉम्लेक्स, महावीर नगर, वखारभाग, सांगली या कार्यालयात सादर करावेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा