बुधवार, ४ जुलै, २०१८

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, उपायुक्त (महसूल) प्रतापराव जाधव, अपर जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आलेल्या विविध वृक्षांची पाहणी केली. या वृक्षांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर हरित होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची डॉ. म्हैसेकर यांना माहिती दिली.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा