बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

युवा पिढीने सामाजिक बांधिलकीतून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात - पालकमंत्री सुभाष देशमुख

माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत ऍ़पचे उद्घाटन

    सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : केंद्र राज्य शासन समाजातील विविध घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असते. या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या तर राष्ट्र खऱ्या अर्थाने वैभवशाली होईल. देशात मोठ्या संख्येने असलेल्या युवकांनी, महाविद्यालयीन तरूणांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या योजना शेवटच्या घटकापर्यत पोहोचवाव्यात. त्यासाठी युवा माहिती दूत ऍ़प उपयुक्त ठरेल, असा विश्वास सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनी यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवा माहिती दूतच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर युवा माहिती दूतची माहिती देणारी चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली. युनिसेफच्या सहयोगाने आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष सहभागाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. स्वागत प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी केले.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा