बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८

समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध - पालकमंत्री सुभाष देशमुख

भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

    सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा विकासाच्या सर्व टप्प्यांवर अग्रेसर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे,अशी ग्वाही 
सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
    भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मोहनराव कदम, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जनतेला शुभेच्छा संदेश दिला.
यावेळी असंसर्गजन्य रोग नियंत्रण तंबाखूनियंत्रण कार्यक्रम प्रभावी अंमलबजावणीकरिता तंबाखूमुक्तीची जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमृत नाटेकर यांनी उपस्थितांना दिली. तसेच, बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेच्या प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या स्टीकरचे अनावरणही पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इंग्लंड येथील राष्ट्रकुल स्पर्धेत फेन्सिंग या प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करून देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल गिरीश जकाते या क्रीडापटूचा सत्कार करण्यात आला. तसेच, राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील 15 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते चांदोली अभयारण्य प्रकल्पबाधित लाभार्थींना  प्लॉटवाटप आदेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अँड्रॉईड ऍ़पचा शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले. यावेळी पत्रकार दीपक आणि राजेश शहा यांचा सत्कार करण्यात आला.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा