सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

केरळ आपद्ग्रस्तांसाठी जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरूच

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : केरळमधील आपद्ग्रस्तांसाठी सांगली जिल्ह्यातून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू आहे. केरळ आपद्ग्रस्तांसाठी मदत देण्याबाबतच्या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत.
अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत अनुलोम संस्था सिध्दनाथ देवस्थान कवठेएकंदच्या वतीने केरळ आपद्ग्रस्तांसाठी मदत जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. तर इंडियन मेडिकल असोसिएशन मिरजच्या वतीने एक लाख 75 हजार रूपये आणि सुंदरनगर वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्र यांच्या वतीने रोख 14 हजार रूपये मदत जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्याकडे सुपूर्द केली. या रोख रकमेचा डीडी काढून तो केरळ आपत्ती निवारण मदत केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. यावेळी सुंदरनगर वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या अध्यक्षा अमिराबी शेख सचिव दीपक चव्हाण अन्य महिला उपस्थित होत्या.
अनुलोम संस्थेच्या माध्यमातून बिस्कीटाचे 23 बॉक्स तसेच 800 नवीन स्वेटर सिध्दनाथ देवस्थान कवठेएकंदच्या वतीने 5 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी अनुलोमचे जिल्हाप्रमुख श्रीनिवास गायकवाड, प्रताप ताटे, शंकर ढोकळे, मानसिंग मोहिते, मनोज चव्हाण, उदय कदम, मनोज पाटील, पृथ्वी पाटील,  शिरगावचे सरपंच अनिल पाटील, विपुल पाटील, गणेश मोहिते आदि उपस्थित होते.
00000










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा