सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते होणार युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : माहिती जनसंपर्क महासंचालनालयामार्फत युवा माहिती दूत असा अभिनव उपक्रम सुरु होत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9.30 वाजता होणार आहे.
शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे. युवा माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी प्रत्यक्ष संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ऍ़पवर ऑनलाईन होणार आहे. 15 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमास जिल्ह्यातील प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, पदाधिकारी, युवक-युवती यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 0233- 2602059 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.  

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा