बुधवार, २७ मार्च, २०१९

आचारसंहिता कालावधीत आतापर्यंत 34 गुन्हे दाखल 17 लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त

- हॉटेल पर्ल, हॉटेल राज यांच्या अनुज्ञप्ती 25 एप्रिलपर्यंत निलंबित

सांगली दि. 27 (जि. मा. का.) : राज्य उत्पादन शुल्क, सांगली विभागामार्फत लोकसभा निवडणुकीची आचारसं?हिता लागू झाल्यापासून दिनांक 26 मार्च 2019 अखेर एकूण 34 गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 लाख 53 हजार 105 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक संजय पाटील यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक संजय पाटील म्हणाले, दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये वारस गुन्हे 31 तर बेवारस 3 गुन्हे आहेत. 30 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. रसायन 7 हजार 462 लिटर, हातभट्टी दारू 203.6 लिटर, देशी दारू 55.54 लिटर, विदेशी दारू 97.05, बिअर 95.76 लिटर, ताडी 480 लिटर यासह 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
आचारसंहिता कालावधीमध्ये विहीत वेळेनंतर अनुज्ञप्तीचे व्यवहार सुरू ठेवल्यामुळे हॉटेल पर्ल, एफएल-3 क्र. एस-52 कृष्णामाई रोड, गावभाग, सांगली (सुधीर पांडुरंग साळुंखे इतर अनुज्ञप्तीधारक) या अनुज्ञप्तीविरूध्द विभागीय गुन्हा नोंदविण्यात आला होता. ही अनुज्ञप्ती दिनांक 25 एप्रिल 2019 पर्यंत निलंबित करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलीस विभागाच्या अहवालानुसार मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हॉटेल राज एफएल-3 मणेराजुरी, ता. तासगाव (सुरेश मारूती पाटील अनुज्ञप्तीधारक) ही अनुज्ञप्ती दिनांक 25 एप्रिल 2019 पर्यंत निलंबित करण्यात आली आहे.
हॉटेल मेजवाणी एफएल-3 एस-97 मौजे सांगली (विजय इसरदास लालवाणी), सीएल-3 क्र. 126 मौजे 100 फुटी रोड, सांगली (सौ. जी. एस. जाधव) या अनुज्ञप्तींच्या कक्षामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे या अनुज्ञप्ती अंतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच परवाना कक्षात विना परवाना (FLX-C) (पिण्याचा परवाना) नसलेल्या ग्राहकांवर तसेच धाब्यांवरील रात्री वेळेनंतरही अवैधरित्या मद्य पिणाऱ्या ग्राहकांवर कार्यवाही करण्याबाबत विशेष पथकांना आदेशीत केले असल्याचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा