बुधवार, २७ मार्च, २०१९

मतदान जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

सांगली दि. 27 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा रविवार, दिनांक 24 मार्च 2019 रोजी आमराई सांगली येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 1 ली ते 4 थी या गटात - आकांक्षा शशिकांत शिंदे, 5 वी ते 7 वी या गटात - वृषभ नेमिनाथ बोरगावे, 8 वी ते 10 वी या गटात - यशश्री अविनाश पाटील, तर खुल्या गटात चैतन्य व्ही शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
महानगरपालिका उपायुक्त मौसमी बर्डे म्हणाल्या, स्पर्धेमध्ये एकूण 606 स्पर्धकांची नोंदणी झाली होती. स्पर्धेसाठी इयत्ता 1 ली ते 4 थी, 5 वी ते 7 वी, 8 वी ते 10 वी खुला गट अशा चार गटांचा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेकरिता पंच कमिटी स्थापन करण्यात आली होती. प्रत्येक गटात प्रथम, व्दितीय तृतीय क्रमांक दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे - इयत्ता 1 ली ते 4 थी - प्रथम क्रमांक - आकांक्षा शशिकांत शिंदे (जीवनविकास शिक्षण मंदिर सांगली), व्दितीय - सोहम महेश कोळी (नविन प्राथमिक शाळा मराठी माध्यम), तृतीय - मुजाहिद इरफान बारगीर (अलअमीन मराठी प्रायमरीस्कूल सांगली), उत्तेजनार्थ 1- प्रांजल प्रदीप पाटील (गुरूकुल इंग्लीश स्कूल सांगली), उत्तेजनार्थ 2 - सिध्दी अमोल जाधव (श्रीमती कळंत्रेआक्का प्राथमिक विद्यामंदिर).
    इयत्ता 5 वी ते 7 वी - प्रथम - वृषभ नेमिनाथ बोरगावे (कांतीलाल पुरूषोत्तम शहा प्रशाला), व्दितीय - श्रेया शीतल काटकर (सिटी हायस्कूल), तृतीय - अथर्व सुदर्शन गडकरी (कांतीलाल पुरूषोत्तम शहा प्रशाला), उत्तेजनार्थ 1 - अनुराग विनायक पोळ (आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल), उत्तेजनार्थ 2 - मयुर व्ही. यमगर (सुपर इंग्लिश मिडीयम स्कूल).
    इयत्ता 8 वी ते 10 वी - प्रथम - यशश्री अविनाश पाटील व्दितीय - आरफा महंमदअय्याज शेख (श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल), तृतीय - सुहाना लियाकत शेख उत्तेजनार्थ 1 - काजल सिंगा हात्तीकर (न्यू हायस्कूल यशवंतनगर सांगली), उत्तेजनार्थ 2 - केतकी विकास लोहार (यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर).
    खुला गट - प्रथम - चैतन्य व्ही शिंदे (सांगली), व्दितीय - दत्तात्रय माणिक मागाडे (सांगली), तृतीय - रवींद्र दामू कांबळे (इनामधामणी ता. मिरज), उत्तेजनार्थ 1 - दीक्षित रामचंद्र अच्युत (स्वामी रामानंद विद्यालय ज्यु. कॉलेज, रामानंदनगर ता. पलूस), उत्तेजनार्थ 2 - पूजा रघुनाथ जाधव (सांगली).
    दिनांक 17 मार्च रोजी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम - गौरी सुभाष झेंडे (पी.डी.व्ही.पी. महाविद्यालय तासगाव), व्दितीय - जस्विका शिवाजी कांबळे (नेमगोंडा पाटील ना. कॉलेज सांगली), तृतीय - गौरी प्रदिप तोडकर (श्रीमती क. वा. कॉलेज सागली (SKWC)), उत्तेजनार्थ 1 - सीमा राजेंद्र शिंदे (डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली), उत्तेजनार्थ 2 - श्रध्दा किशोर वाईकर (संस्थामाता सुशिलादेवी साळुखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव) श्रेया राजाराम सावर्डे (श्रीमती रा. ने. पाटील गर्ल्स हायस्कूल ज्यु. कॉलेज सांगली).
दिनांक 17 मार्च रोजी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे - प्रथम - हर्षवर्धन चंद्रकांत आलासे (शांतिनिकेतन कॉलेज सांगली), व्दितीय - तिलेश्वरी आनंद दोडमणी (KWC कॉलेज सांगली), तृतीय - प्राजक्ता जगन्नाथ पाटील (महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय तासगाव), उत्तेजनार्थ 1 - प्रशांत सुनिलदत्त यादव (राजे रामराव महाविद्यालय जत), उत्तेजनार्थ 2 - दुर्गेश्वरी मारूती जावीर (सांगली हायस्कूल आणि विनोद भाटे ज्युनि. कॉलेज सांगली).

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा