रविवार, २४ मार्च, २०१९

मिनी मॅरेथॉनव्दारे क्षयरोग जनजागृती

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून विविध क्षयरोग जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो. यानिमित्त आज एक धाव क्षयरोग उच्चाटनासाठी मिनी मॅरेथॉन आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत त्यांच्या पत्नी अनुराधा राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुजाता जोशी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदि उपस्थित होते.
    क्षयरोग जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉनचा प्रारंभ अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे झेंडा दाखवून केला. पुढे ही मिनी मॅरेथॉन शंभर फुटी, डी मार्ट, शेतकरी वाडा, माळी चित्रमंदिर, दिलीप टायर्स या मार्गे निघून पुन्हा शासकीय रूग्णालय येथे तिची सांगता झाली. यावेळी या मिनी मॅरेथॉनमध्ये सहभागी सर्वाना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी क्षयरोगाची लक्षणे, त्यावरील उपचार तसेच क्षयरोगाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
    ही मिनी मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी निर्मल व्यसनमुक्ती केंद्र, आई हॉस्पिटल, मॅटर्निटी अडव्हान्सड लॅप्रोस्कोपी सेंटर मिरज, ओम गणेश ट्रान्सपोर्ट सांगली, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, डॉ. मोहिते मायक्रोपॅथी लॅबोरेटरी सांगली, मेहता हॉस्पिटल सांगली, श्रीपाद लँड डेव्हलपर्स सांगली, रोटरी क्लब सांगली, सूर्यवंशी कन्सट्रक्शन सांगली, संजीवन मॅटर्निटी हॉस्पिटल सांगली, अवंती स्टील सांगली, वरद रोडवेज, पाळंदे कुरिअर, जयराम बर्गे गव्हर्नमेंट कॉन्ट्रक्टर, मालगावे मिल्क ऍ़ण्ड मिल्क प्रोडक्ट, इरळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, मुक्ता सोशल फौंडेशन जयसिंगपूर, आशा फौंडेशन मिरज, वर्ल्ड व्हिजन मिरज, प्रोजेक्ट अक्षय चाय संस्था, सेवा सदन कम्युनिटी डेव्हलपमेंट फौंडेशन मिरज, परिवर्तन फौंडेशन सांगली, दि. सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप सोसायटी लि. सांगली यांचे सहकार्य लाभले.
    या मिनी मॅरेथॉनमध्ये विविध संस्था, एनजीओ, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, शासकीय रूग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा