सोमवार, २५ मार्च, २०१९

जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशन प्रक्रियेबाबत राजकीय पक्ष प्रतिनिधींना दिली माहिती


सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : नामनिर्देशन प्रक्रियेबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती देण्यात आली. दि. 28 मार्चपासून नामनिर्देशन प्रकिया सुरू होत असून, ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतींनी सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
    यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी उमेदवारांची नामनिर्देशन पत्र भरताना त्यांचा अर्ज Form No. 2A मध्ये सादर करावा. अर्जासोबत शपथ पत्राचा नमुना, Form No 26 , अनामत रक्कम जमा केलेची पावती, मतदार यादीची चिन्हांकित प्रत, Form  A  & B  जोडण्यात यावे.
सदरचा अर्ज दि. 28 मार्च  ते 04 एप्रिल 2019 या कालावधीत सकाळी  11.00 ते 3.00 या वेळेत दाखल करता येईल. दि.31 मार्च 2019  रोजी रविवार सार्वजनिक सुट्टी असलेने अर्ज दाखल करता येणार नाही. सदरचा अर्ज हा स्वत: उमेदवार किंवा त्यांचे सूचक यांना दाखल करता येईल.
उमेदवाराचे वय 25 वर्ष पूर्ण किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे. उमेदवार कोणत्या पक्षामार्फत निवडणूक लढवत आहे त्याचा त्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा स्पष्ट उल्लेख नमूद करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने आपल्या स्वत:च्या नावाचे अचूक स्पेलिंग नमूद करणे आवश्यक आहे.
नामनिर्देशन पत्र दाखल करताना निवडून निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या  100 मीटर परिसरात 3 पेक्षा जास्त वाहनांचा प्रवेश निषिद्ध आहे.
नामनिर्देशन पत्रासोबत 25,000/- रु. अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे उमेदवार SC/ ST प्रवर्गातील असल्यास 12,500/- मात्र अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे. त्याकरिता SC/ ST जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.  
नामनिर्देशन पत्र दाखल करताना उमेदवारासह कमाल 5 व्यक्तींना दालनात प्रवेश करता येईल. एका उमेदवाराला एका मतदार संघात कमाल 4 नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील. तसेच एका उमेदवाराला कमाल दोन मतदार संघामधूनच निवडणूक लढविता येईल.
उमेदवाराचा सूचक हा त्या मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत राष्ट्रीय/ राज्य पक्षाच्या उमेदवारास आवश्यक सूचक संख्या एक इतकी असून अपक्ष उमेदवारास ती 10 असणे आवश्यक आहे. सूचक हा एका उमेदवाराच्या किंवा एका पेक्षा अधिक उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी करू शकतो.
नामनिर्देशन पत्राच्या छाननी वेळी उमेदवार स्वत: त्याचा मतदान प्रतिनिधी, सूचक आणि विधिज्ञ अशा कमाल व्यक्तींना उपस्थित राहता येईल.  Form No 5 भरून उमेदवारस स्वत: किंवा सूचक किंवा मतदान प्रतिनिधी यांचेमार्फत अर्ज माघारी घेता येईल. त्यासाठी सूचक किंवा मतदान प्रतिनिधी यांचे सोबत उमेदवारांचे स्वाक्षरीचे पत्र असणे आवश्यक आहे.
         नामनिर्देशन पत्रासोबत देण्यात येणाऱ्या छायाचित्राचा आकार  2 से.मी * 2.5 से.मी असणे आवश्यक आहे. तसेच सदरचे छायाचित्र हे ब्लँक अँन्ड व्हाईट किंवा रंगीत गेल्या तीन महिन्यातील असावा. छायाचित्राच्या मागील बाजूस उमेदवाराची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. फोटो मागील 3 महिन्याच्या कालावधीतील असलेबाबत उमेदवाराने प्रमाणित करावे. तसेच फोटोमध्ये कपडे साधे असावेत, गॉगल, टोपी किंवा हॅट नसावी.
           उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी एक दिवस आधी कोणत्याही बँकेत खाते उघडलेले असावे. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत निवडणुकीसाठी खर्च करण्याचा कालावधी गृहीत धरण्यात यावा. बँकेतील खाते पुस्तकाचा क्रमांक उमेदवाराने नामनिर्देशनपत्र सादर करतेवेळी लेखी कळविणे आवश्यक आहे सदर पासबुकची सत्यप्रत संल्गन करणे आवश्यक आहे.
 Affidavit 26    बाबत सदर प्रतिज्ञा पत्रातील कोणताही रकाना मोकळा सोडू नये. तसेच प्रतिज्ञा पत्रातील एखाद्या मुद्यांची माहिती निरंक असल्यास सदर रकाना कोरा सोडता निरंक असे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे.
मुद्दा क्र.6 A उमेदवारांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या सर्व फौजदारी गुन्ह्याबाबत तसेच दोषसिद्धी            झालेल्या गुन्ह्याबाबत माहिती ते ज्या पक्षाकडून निवडणूक लढवीत आहेत त्यांना ते देणे बंधनकारक आहे.
FORMAT C- 1 तसेच अशा उमेदवारांनी किमान तीन वेळा याबाबतची माहिती अर्ज माघारीच्या दिवसापासून ते मतदानाच्या दोन दिवस अगोदरपर्यंत वर्तमान पत्रात दृकश्रीव्य माध्यमाद्वारे देणे बंधनकारक आहे.
FORMAT C- 2 तसेच असे उमेदवार ज्या पक्षामार्फत निवडणूक लढवित आहेत अशा पक्षाने देखील त्यांच्या वेबसाईटवर तसेच दृक श्राव्य माध्यम वर्तमान पत्रातून FORMAT C- 2 मध्ये किमान तीन वेळा परंतु मतदानाची 48 तास आधीपर्यंत प्रसिद्ध करणे बंधन कारक आहे. याबाबतचा एकत्रित अहवाल निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या पासून 30 दिवसाच्या आत मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कडे देणे बंधनकारक आहे.
FORMAT C- 3 वरीलप्रमाणे मुद्दा 5 6 मध्ये ज्या उमदेवारांनी फौजदारी गुन्हे / दोषसिद्धी बाबत माहिती दिली आहे अशा सर्व उमदेवारांना सदर माहिती वर्तमान पत्रात दृक श्राव्य माध्यमात प्रसिद्धी देणेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून स्मरण पत्र देण्यात येईल.
उमेदवाराने सार्वजनिक वित्तीय संस्था शासनाचे उत्तरदायित्व याबाबत माहिती देणे  बंधनकारक आहे.शासकीय निवासस्थान वापरले बाबतची कोणतीही देणी थकीत नसावीत. उदा. भाडे, वीज देयक, पाणी पट्टी, दुरध्वनी देयके या चार मुद्याबाबत ना-देय प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील. आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा