गुरुवार, २८ मार्च, २०१९

अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्या हस्ते मतदार जनजागृती चित्ररथाचा शुभारंभ

सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत 282 सांगली विधानसभा मतदारसंघात चित्ररथाद्वारे जनजागृतीचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वसुंधरा बारवे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना कापसे आदि उपस्थित होते.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सर्व मतदान केंद्रांवर हा चित्ररथ जाणार आहे. त्यावरून मतदार जनजागृती करणाऱ्या जिंगल्स प्रसारित करण्यात येणार आहेत.
00000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा