शनिवार, १६ मार्च, २०१९

आदर्श आचारसंहिता - काय करावे ? काय करू नये ?

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्च 2019 पासून जिल्ह्यात या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता लागू असताना निवडणूक काळात काय करावे आणि काय करु नये याबाबत माहिती देणारा हा लेख -
हे करु नये
·       मंत्री महोदय लोकप्रतिनिधी यांच्या निवडणूक काळातील प्रचार दौऱ्यासाठी शासकीय वाहने वापरु नयेत अथवा शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्या दौऱ्यात सामील होऊ नये.
·       आचारसंहितेपूर्वी लावण्यात आलेली सर्व प्रकारचे राजकीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख असलेली भित्तीपत्रके, पोस्टर्स, कोनशिला इत्यादी बाबी आचारसंहिता लागताच झाकून घेण्यात यावीत.
·       भित्तीपत्रके / पोस्टर्स / हॅन्डबिले पूर्व परवानगीशिवाय छापू नयेत.
·       भित्तीपत्रके / पोस्टर्स / हॅन्डबिले खाजगी सरकारी जागेत लावण्यापूर्वी योग्य त्या पूर्व परवानगी घेण्यात याव्यात.
·       सदर प्रचार साहित्याखाली, मुद्रक, प्रकाशक, जाहिरातदार यांची नावे संख्या छापणे बंधनकारक आहे.
·       डिफेसमेन्ट ऍ़क्ट चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
·       प्रचारसभा, प्रचारफेऱ्या या पूर्व परवानगीशिवाय करण्यात येऊ नयेत.
·       प्रचारकामी सर्व प्रकारची वाहने निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे पूर्व परवानगी घेऊन वापरता येतील.
·       ध्वनीक्षेपण यंत्रणा लेखी पूर्व परवानगीशिवाय वापरण्यात येऊ नये.
·       ध्वनीक्षेपण यंत्रणा सकाळी 6 पूर्वी रात्री 10 नंतर वापरू नये. 
·       विनापरवाना बैठका तसेच सार्वजनिक ठिकाणी  भाषण करु नये.
·       शासकीय विश्रामगृह शासकीय कामाव्यतिरिक्त कोणत्याही इतर कामासाठी वापरु नयेत.
·       शासकीय वाहने शासकीय कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी वापरु नयेत.
·       प्रचारसभेसाठी खुल्या जागा सर्वाना समान संधी याप्रकारे वितरीत करण्यात याव्यात.  
·       निवडणूक काळातील प्रचारासाठीच्या सर्व आवश्यक परवानग्या एक खिडकी योजनेअंतर्गत विहीत मुदतीत देण्यात याव्यात.
·       निवडणूक विषयक जाहिराती, वृत्तपत्रातील जाहिराती, इलेक्ट्रॉनिक मिडियातील जाहिराती, टीव्ही - केबलवरील   सोशल मिडियावरील जाहिराती पूर्व परवानगीशिवाय देऊ नयेत.
·       कोणत्याही प्रकारचे प्रचाराविषयक साहित्य पूर्व परवानगीशिवाय वापरु नये.
·       शासकीय खर्चाने कोणतीही निवडणूक विषयक जाहिरात करता येणार नाही.
·       मतदार यादीत नाव नसलेल्या मतदान केंद्रावर उमेदवाराखेरीज इतर लोकप्रतिनिधींना जाता येणार नाही.
·       जात, धर्म, किंवा भाषा यांच्या आधारे प्रचार करता येणार नाही.
·       जातीय किंवा धार्मिक ध्रुवीकरण यांचे आधारे प्रचार करता येणार नाही.
·       सार्वजनिक शांतता भंग होणार नाही अशा पध्दतीने प्रचार करणे बंधनकारक आहे.
·       धार्मिक स्थळांचा वापर प्रचारकामी करता येणार नाही.
·       मतदारांना आमिष (पैसा, दारु इत्यादी) दाखवून प्रचार करता येणार नाही.
·       मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या हद्दीत प्रचार करता येणार नाही.
·       खाजगी जागेत प्रचार साहित्य संबंधित जागा मालकाची तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या पूर्व परवानगी शिवाय लावता येणार नाही.
·       शासकीय जागेत प्रचार साहित्य लावता येणार नाही.
·       सार्वजनिक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पूर्व परवानगी शिवाय प्रचार साहित्य लावता येणार नाही.
·       मतदाना दिवशी अधिकृत ओळख पत्राशिवाय कोणालाही मतदान केंद्रामध्ये प्रवेश देऊ नये.

हे करावे  
·       आचारसंहितेपूर्वी सुरु झालेली कामे सुरु ठेवता येतील.
·       मदत पुनर्वसन संदर्भातील नैसर्गिक आपत्तीमधील कामे सुरु ठेवता येतील.
·       वैद्यकीय मदतीची देयके पूर्व परवानगीने देता येतील.
·       उमेदवार / राजकीय पक्ष यांना पूर्व परवानगीने प्रचारासाठी कार्यालये  निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादेत सुरु करता येतील.
·       प्रचारासाठी रिकाम्या जागा / मैदाने ही स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस इतर  आवश्यक त्या पूर्व परवानगीने सर्वांना समान न्याय या तत्वाने देता येतील.
·       प्रचारसभा, प्रचारफेऱ्या निवडणूक विषयक बैठका पोलिसांच्या पूर्व परवानगीने घेता येतील.
·       प्रचारकामी सर्व प्रकारची वाहने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या मर्यादेत नियमाप्रमाणे पूर्व परवानगी घेऊन वापरता येतील.
·       ध्वनीक्षेपण यंत्रणा पोलिसांच्या पूर्व परवानगीने वापरता येतील.
·       प्रचारसभा, प्रचारफेऱ्या यांच्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात यावा.
·       प्रचारसभा, प्रचारफेऱ्या वाहतुकीसाठी अडथळा येणार नाही या पध्दतीने घेण्यात याव्यात.
·       प्रचार साहित्य पूर्व परवानगीने वापरण्यात यावे.
·       प्रचार साहित्य, हँडबिले, पोस्टर्स इत्यादी पूर्व परवानगीने छापता येतील.
·       निवडणूक विषयक कोणतीही तक्रार तात्काळ निवडणूक यंत्रणेच्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे.
·       निवडणूक आयोगाच्या सर्व सूचना सर्वाना बंधनकारक आहेत.

संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,
सांगली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा