रविवार, ३१ मे, २०२०

सांगली जिल्ह्यात आज सायंकाळी ७ पर्यंत दोन रुग्ण कोरोनाबाधित सद्यस्थितीत उपचाराखाली ४५ रूग्ण - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली दि. 31( जि.मा.का) :  सांगली जिल्ह्यात आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत दोन रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 45 झाली आहे. आज अखेर 63 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 112 हा रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. कोरोना बाधित रुग्णांपैकी एका रुग्णांची स्थिती चिंताजनक असून तिघांची स्थिती स्थीर आहे. आज चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
आज कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मणदुर तालुका शिराळा येथील 81 वर्षाचा पुरूष आहे (मुंबई वरून त्यांची दोन मुले आलेली आहेत त्यांच्या संपर्कात आल्यामुळे). तसेच दत्त कॉलनी मिरज म.न.पा. कार्यक्षेत्रातील 67 वर्षाचा पुरूष असून सदर व्यक्ती ॲम्बुलन्स मधून दिनांक २७ मे रोजी मुंबईवरून आली होती, अशा दोघांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी औंढी तालुका जत  येथील 55 वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील 48 वर्षाच्या पुरूष रूग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. खिरवडे (शिराळा) येथील ५६ वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. मणदुर (शिराळा) येथील ८१ वर्षाच्या पुरूष रूग्णास ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरू असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे.
आटपाडी येथील २६ वर्षाचा पुरूष, सोनारसिध्द नगर (आटपाडी) येथील २२ वर्षाची महिला, जांभुळणी (आटपाडी) येथीहल ५३ वर्षाचा पुरूष, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उत्तर शिवाजी नगर येथील १५ वर्षाची मुलगी, असे चार रूग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत.
00000



कोरोना बाधीतांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय मनुष्यबळाला आवश्यक संरक्षक सामुग्री उपलब्ध करून द्या - सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम



गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाहीत याची सर्वोतोपरी दक्षता घ्या

सांगली दि. 31 (जि.मा.का) : सांगली जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा १०० च्या वर गेला असला तरी उपचाराखालील रूग्णांची संख्या 47 आहे.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व आरोग्य यंत्रणेने त्वरेने केलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, असे सांगून पुढील महिन्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्या दृष्टीने आवश्यक ती सर्व तयारी ठेवावी. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स, औषधसाठा याबरोबरच कोरोना बाधीतांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय मनुष्यबळाला आवश्यक संरक्षक सामुग्री उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोराना व विविध विषया संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
          या बैठकीत आरोग्य, कृषि यासह अन्य विषयांशी संबंधित विविध मुद्यांचा आढावा घेताना राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, खरीप हंगामासाठी जिल्ह्याला असणाऱ्या पीक कर्जाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करा. शेतकऱ्यांना सुलभ व गतीने कर्ज वितरण करा. जे शेतकरी खरोखर गरजू आहेत ते पीक कर्जापासून वंचित राहणार नाहीत याची सर्वोतोपरी दक्षता घ्या. शेतकऱ्यांना खरीपासाठी खते, बी-बियाणे व किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची योग्य ती खबरदारी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व किटकनाशके पोहोच करण्यासाठी आवश्यक तजवीज करा. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या कृषि यंत्रणेने अलर्ट रहावे व नियत्रंणासाठी आराखडा तयार करावा. कोरोना बाधित कुटुंबाला क्वारंटाईन करत असताना त्यांच्या पशुधनासाठीही प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
          परराज्यातील कामगार, मजूर लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या मूळ गावी गेल्यामुळे उद्योजकांना त्या दृष्टीने निर्माण झालेली अडचण कशा पध्दतीने सोडविता येईल याचा विचारविमर्श करण्यासाठी प्रशासनाने उद्योजकांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, असेही राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी यावेळी सूचित केले.
          ग्रामीण भागात असणाऱ्या रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे कामाच्या ठिकाणी निवासी रहात असल्याबाबत खातरजमा करावी. तसेच ज्या शासकीय निवासस्थानांमध्ये सदर व्यक्ती रहात असतील त्या ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या अडचणी समजून घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्हा परिषद यंत्रणेला दिले.
00000

शनिवार, ३० मे, २०२०

कडेगाव तालुक्यातील आंबेगाव गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : कडेगाव तालुक्यातील मौजे आंबेगाव गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत मौजे आंबेगाव गावात कंटेनमेंट बफर झोन अधिसूचित केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - कडेगाव तालुक्यातील मौजे आंबेगाव येथील 1) कराड - विटा रोडपासून उत्तरेस नेवरी आंबेगाव रस्ता 2) चिरकाट वस्तीपासून पश्चिमेस येरळा नगर कमानी पर्यंत 3) नेवरी आंबेगाव रस्त्यापासून दक्षिणेस कराड - विटा रोड 4) येरळा नगर कमानीपासून पूर्वेस चिरकाट वस्तीपर्यंत.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कडेगाव तालुक्यातील खेराडेवांगी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : कडेगाव तालुक्यातील मौजे खेराडेवांगी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत खेराडेवांगी गावात कंटेनमेंट बफर झोन अधिसूचित केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - कडेगाव तालुक्यातील मौजे खेराडेवांगी येथील 1) शिवनी ते खेराडेवांगी रस्त्यापासून पश्चिमेकडील देवनगर पर्यंतचा रस्ता 2) हजारे वस्तीपासून उत्तरेकडील ओढापात्रापर्यंत भाग 3) देवनगर वस्तीपासून पूर्वेकडील ओढापात्रापर्यंतचा भाग 4) उत्तरेस ओढा पात्रापासून दक्षिणेकडील हजारे वस्ती पर्यंतचा भाग.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

शिराळा तालुक्यातील करूंगली गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : शिराळा तालुक्यातील मौजे करूंगली गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - शिराळा तालुक्यातील मौजे करूंगली येथील 1) शिवाजी सहदेव नायकवडी यांची जमीन ते बबुताई दादू नांगरे यांचे घर 2) अनिल यदू नांगरे यांचे घर ते सुनिल निवृत्ती नांगरे यांचे घर 3) आनंदा गुंडा चौगुले यांचे घर ते अनिल यदू नांगरे यांचे घर 4) सुनिल निवृत्ती नांगरे यांचे घर ते बबूताई दादू नांगरे यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) निनाईदेवी साखर कारखाना ते सुर्यकांत भाऊ पाटील यांची जमीन 2) सूर्यकांत भाऊ पाटील यांची जमीन ते किसन रावजी पाटील यांची जमीन 3) किसन रावजी पाटील यांची जमीन ते लक्ष्मण पांडुरंग गुरव यांची जमीन 4) लक्ष्मण पांडुरंग गुरव यांची जमीन ते निनाईदेवी साखर कारखाना.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000
-font-family:DVB-TTSurekh'> आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000