सांगली,
दि. 04,
(जि. मा.
का.) :
जिल्ह्यात कोरोना
विषाणूचा संसर्ग
वाढू नये
म्हणून विविध
प्रतिबंधात्मक उपाय
योजना करण्यात
येत आहेत.
कोरोना विषाणूचा
संसर्ग वाढू
नये म्हणून
राज्य शासनाने
लॉकडाऊन जाहीर
केला आहे.
त्याअनुषंगाने सांगली
जिल्हा स्थलसीमा
हद्दीत विविध
प्रतिबंधात्मक ओदश
निर्गमित करण्यात
आले आहेत.
सदर आदेशांचा
अंमलबजावणी कालावधी
दिनांक 03 मे
2020 पर्यंत
निर्गमित करण्यात
आलेला होता.
तथापि महाराष्ट्र
शासनाने लॉकडाऊन कालावधी वाढविल्याने विविध प्रतिबंधात्मक आदेशाचा कालावधीही दि. 17 मे 2020 रोजीचे
24.00 वाजेपर्यंत
वाढविण्यात आल्याचे
आदेश जिल्हादंडाधिकारी
डॉ. अभिजीत
चौधरी यांनी
स्पष्ट केले
आहेत.
भारतीय
साथ रोग
नियंत्रण अधिनियम
1897, आपत्ती
व्यवस्थापन अधिनियम
2005, कलम
34 मधील
पोटकलम (c)
व (m),
महाराष्ट्र शासन
क्र. करोना
2020.प्र.क्र.58/आरोग्य 6 दि.
14 मार्च
2020, महाराष्ट्र
शासन आदेश
क्र. 40-3/2020-डी
दि. 24
मार्च 2020,
महाराष्ट्र शासन
परिपत्रक क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1
दि. 13
एप्रिल 2020,गृह विभाग भारत
सरकार यांचेकडील आदेश क्र.40-3/2020- डीआयएसएम-1(अ) दि.
15 एप्रिल
2020, अन्वये लागू
करण्यात आलेल्या
आदेशांमध्ये शासनाच्या
आदेशानुसार बदल
करणे आवश्यक
असून महाराष्ट्र शासन,
महसूल व
वन, आपत्ती
व्यवस्थापन, मदत
व पुनर्वसन,
मंत्रालय यांचेकडील
आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/
डीआयएसएम-1 दि.
02 मे 2020 या
आदेशांना अन्वये लॉकडाऊन
काळात कार्यवाही
करणे आवश्यक
आहे. त्याअर्थी
जिल्हादंडाधिकारी डॉ.
अभिजीत चौधरी
यांनी सांगली
जिल्ह्यात महाराष्ट्र
शासनाच्या दि.
02 मे 2020
रोजीच्या आदेशामधील
तरतुदींची अंमलबजावणी
करण्याबाबत आदेशित
केले आहे.
सदरचा
आदेशांचे उल्लंघन केलेस, संबधितांविरूध्द आपत्ती व्यवय्थापन
अधिनियमचे कलम 51 तसेच भारतीय दंड
संहिता 1860
चे कलम
188 नुसार शिक्षेस पात्र अपराध केले असे मानण्यात येईल. या आदेशांचे
भंग करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल
करण्याकामी सांगली
जिल्ह्यातील संबंधित
पोलीस ठाण्याचे
प्रभारी अधिकारी
/ कर्मचारी
यांना या
आदेशाव्दारे प्राधिकृत
करण्यात आले
आहे, असे
जिल्हादंडाधिकारी डॉ.
अभिजीत चौधरी
यांनी स्पष्ट
केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा