शनिवार, २३ मे, २०२०

आटपाडी तालुक्यातील मरगळेवस्ती (गोंदिरा) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : आटपाडी तालुक्यातील मरगळेवस्ती (गोंदिरा) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - आटपाडी तालुक्यातील आटपाडी येथील 1) आटपाडी गावाचे पूर्व - मरगळेवस्ती (गोंदिरा) ते शामराव तळे यांचे घर 2) आटपाडी गावाचे पश्चिम - मरगळेवस्ती (गोंदिरा) ते राघू तुकाराम मरगळे यांची शेतातील झोपडी 3) आटपाडी गावाचे दक्षिण - मरगळेवस्ती (गोंदिरा) ते जालिंदर तुकाराम मरगळे यांचे घर लगत ओढा पात्र 4) आटपाडी गावाचे उत्तर - मरगळेवस्ती (गोंदिरा) ते हणमंत तातोबा मरगळे यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट  झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) आटपाडी गावाचे मरगळेवस्ती (गोंदिरा) पूर्व - राघू तुकाराम मरगळे यांचे घर ते आटपाडी शेटफळे रस्ता जि.प. शाळा बिरूबन 2) आटपाडी गावाचे मरगळेवस्ती (गोंदिरा) पश्चिम - राघू तुकाराम मरगळे यांचे घर ते गोंदिरावस्ती आटपाडी 3) आटपाडी गावाचे मरगळेवस्ती (गोंदिरा) दक्षिण - राघू तुकाराम मरगळे यांचे घर ते जालिंदर मरगळे यांच्या घराच्या पलीकडील ओढापात्र 4) आटपाडी गावाचे मरगळेवस्ती (गोंदिरा) उत्तर - राघू तुकाराम मरगळे यांचे घर ते हणमंत तातोबा मरगळे यांच्या घरापलीकडे खडी (माळराण).
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा