रविवार, १७ मे, २०२०

कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 17, (जि. मा. का.) : सांगली जिल्हयातील कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्दे गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील 1) ओढ्याच्या पूर्वेकडील भाग गट नं. 516 पर्यंत 2) कॅनॉलच्या उत्तरेकडील भाग हिंगणगादे रस्त्यापर्यंत 3) हिंगणगादे रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग कॅनॉलपर्यंत 4) विश्वनाथ गुंडा सावंत यांच्या घराच्या पश्चिमेकडील भाग, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) भिकवडी खुर्द गावाच्या पूर्वेकडील पूल - अंतर 1 कि.मी. 2) भिकवडी खुर्द ते खेराडे विटा रस्ता पश्चिमेस - अंतर 1.5 कि.मी. 3) भिकवडी खुर्द ते कोतीज रस्ता उत्तरेकडे - अंतर 1.5 कि.मी. 4) भिकवडी खुर्द ते तुपेवाडी दक्षिणेकडील रस्ता - अंतर 1 कि.मी.
या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा