मंगळवार, २६ मे, २०२०

आटपाडी तालुक्यातील कामथ येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : आटपाडी तालुक्यातील कामथ येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - आटपाडी तालुक्यातील कामथ येथील 1) कामथ गावचे उत्तर - ग्रामपंचायत कामथ पासून कामथ वाक्षेवाडी रोड वरील ओढापात्र (थोरला ओढा) 2) कामथ गावचे दक्षिण - ग्रामपंचायत कामथ पासून कामथ शेंडगेवाडी रोड वरील ओढापात्र (धाकला ओढा) 3) कामथ गावचे पूर्व - ग्रामपंचायत कामथ पासून आटपाडी आटपाडी-विटा रोड वरील दिलीप माने यांचे घर 4) कामथ गावचे पश्चिम - ग्रामपंचायत कामथ पासून आटपाडी विटा रोड वरील मायाक्का मंदिर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) कामथ गावचे उत्तर - ग्रामपंचायत कामथ पासून कामथ वाक्षेवाडी रोड वरील पांडुरंग सरक यांचे घर 2) कामथ गावचे दक्षिण - ग्रामपंचायत कामथ पासून कामथ शेंडगेवाडी रोड वरील मुकूंद कारंडे यांचे शेत 3) कामथ गावचे पूर्व - ग्रामपंचायत कामथ पासून आटपाडी आटपाडी-विटा रोड वरील ओढा पात्रातील मुल 4) कामथ गावचे पश्चिम - ग्रामपंचायत कामथ पासून आटपाडी विटा रोड वरील विद्युत डिपी.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा