शनिवार, ९ मे, २०२०

सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कंटेनमेंट व बफर झोन अधिसूचित - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीत एकाची कोरोना चाचणी  पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन अधिसूचित केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन अधिसूचित केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील 1) आसमंत बंगला ते समकित बंगला 2) समकित बंगला ते नयनतारा हॉस्पीटल 3) नयनतारा हॉस्पीटल ते गुलमोहर पार्क रिक्षा स्टॉप 4) गुलमोहर पार्क रिक्षा स्टॉप ते चंद्रा अपार्टमेंट 5) चंद्रा अपार्टमेंट ते आशिर्वाद बंगला 6) आशिर्वाद बंगला ते आसमंत बंगला. या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - कंटेनमेंट झोनच्या स्थलसीमा हद्दीबाहेर उर्वरित महानगरपालिका स्थलसीमा हद्द  1) रजपूत क्लासेस ते चांदणी चौक 2) चांदणी चौक ते हॉटेल शेतकरी वाडा 3) हॉटेल शेतकरी वाडा ते त्रिमुर्ती चौक 4) त्रिमुर्ती चौक ते सदगुरू पिठाची गिरणी 5) सदगुरू पिठाची गिरणी ते मराठा सेवा संघ 6) मराठा सेवा संघ ते रिलायन्स मार्केट कंपाऊंड 7) रिलायन्स मार्केट कंपाऊंड ते रजपूत क्लासेस पर्यंत असा आहे.
या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा