मंगळवार, २६ मे, २०२०

वाळवा तालुक्यातील वाळवा गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : वाळवा तालुक्यातील वाळवा गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन ( 200 मीटर) - वाळवा तालुक्यातील वाळवा येथील 1) चांदोली वसाहत पाण्याची टाकी ते श्री औदुंबर पदमण यांचे घर (साखराळे रस्ता) 2) श्री औदुंबर पदमण यांचे घर (साखराळे रस्ता) ते सर्जेराव लोहार यांचे घर 3) सर्जेराव लोहार यांचे घर ते बी. के. सुर्यवंशी सुनिल पाटील यांचे घर 4) बी. के. सुर्यवंशी सुनिल पाटील यांचे घर ते शरद नागू माळी यांचे घर 5) शरद नागू माळी यांचे घर ते चांदोली वसाहत पाण्याची टाकी, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) हुताम्मा चौक वाळवा ते खेड रस्ता मेटकरी वस्ती, अमरसिंह थोरात वस्ती 2) मेटकरी वस्ती, अमरसिंह थोरात वस्ती ते लालासो पाटील वस्ती 3) लालासो पाटील वस्ती ते सरकार मळी, हुतात्मा साखर कारखाना शेती 4) सरकार मळी, हुतात्मा साखर कारखाना शेती ते कामेरी रोड, अरविंद धनवडे यांची शेती 5) कामेरी रोड, अरविंद धनवडे यांची शेती ते शिवाजी व्यायाम मंडळ, आरोग्य केंद्र ग्रा.पं. इमारत ते हुतात्मा चौक.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा