शनिवार, २३ मे, २०२०

खानापूर तालुक्यातील बलवडी (खा) गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : खानापूर तालुक्यातील बलवडी (खा) गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - खानापूर तालुक्यातील बलवडी (खा) येथील 1) गोरेवाडी बलवडी रस्त्यालगत भास्कर जगन्नाथ गायकवाड, नामदेव जगन्नाथ गायकवाड आणि गजानन नानासो जाधव यांच्या शेताची हद्द 2) गोरेवाडी बलवडी रस्त्यालगत जगन्नाथ ज्ञानू डिसले, परशुराम शिवाजी गायकवाड, किसन शामराव गायकवाड यांच्या शेताची हद्द 3) गोरेवाडी खरसुंडी रोड लगत ब्रम्हदेव बापू गायकवाड, नामदेव जगन्नाथ गायकवाड यांच्या शेताची हद्द 4) अर्जुन वसंत गायकवाड, किसन शामराव गायकवाड यांच्या शेताची हद्द, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) बलवडी (खा) गावाच्या पूर्वेस दिनकर गायकवाड यांच्या घराच्या हद्दी पर्यंत 2) बलवडी (खा) गावाच्या पश्चिमेस अग्रणी नदी पर्यंत 3) बलवडी (खा) गावाच्या दक्षिणेस खानापूर हद्दी पर्यंत 4) बलवडी (खा) गावाच्या उत्तरेस भूड गावची हद्द.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा