मंगळवार, २६ मे, २०२०

आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती) येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - आटपाडी तालुक्यातील जांभुळणी (गावडे वस्ती) येथील 1) जांभुळणी गावाचे (गावडे वस्ती) उत्तर - जुगरवस्ती ओढापात्र 2) जांभुळणी गावाचे (गावडे वस्ती) दक्षिण - अर्जुन शंकर झंजे यांचे घर 3) जांभुळणी गावाचे (गावडे वस्ती) पूर्व - अंकुश यशवंत यांची शेतजमिन 4) जांभुळणी गावाचे (गावडे वस्ती ) पश्चिम - संतोष जानाजी जुगदर यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) जांभुळणी गावाचे (गावडे वस्ती) उत्तर - जाधव वस्तीवरील शहाजी विठोबा जाधव यांचे घर 2) जांभुळणी गावाचे (गावडे वस्ती) दक्षिण - झंजेवस्ती लगतचा ओढापात्र 3) जांभुळणी गावाचे (गावडे वस्ती) पूर्व - विठ्ठल जयसिंग माने यांचे घर 4) जांभुळणी गावाचे (गावडे वस्ती ) पश्चिम - जांभुळणी तलाव.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा