शनिवार, ३० मे, २०२०

कडेगाव तालुक्यातील आंबेगाव गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : कडेगाव तालुक्यातील मौजे आंबेगाव गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत मौजे आंबेगाव गावात कंटेनमेंट बफर झोन अधिसूचित केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - कडेगाव तालुक्यातील मौजे आंबेगाव येथील 1) कराड - विटा रोडपासून उत्तरेस नेवरी आंबेगाव रस्ता 2) चिरकाट वस्तीपासून पश्चिमेस येरळा नगर कमानी पर्यंत 3) नेवरी आंबेगाव रस्त्यापासून दक्षिणेस कराड - विटा रोड 4) येरळा नगर कमानीपासून पूर्वेस चिरकाट वस्तीपर्यंत.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा