सोमवार, ४ मे, २०२०

सांगली जिल्ह्यात 655 उद्योग घटक सुरू - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 03 मे अखेर अत्यावश्यक असणाऱ्या 416 उद्योगांना व यातील 6637 कर्मचाऱ्यांची  ऑफलाईन परवानगी देण्यात आली आहे. यात एमआयडीसी मधील 184 युनिट व 1945 कर्मचारी तर या व्यतिरिक्त 232 युनिट व 4692 कर्मचारी यांचा समावेश आहे. यासह परवानगी पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज असे एकूण  655 उद्योग व त्यांनी मागणी केलेल्या 189 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
यामध्ये अत्यावश्यक उद्योग घटकांमध्ये अन्न पदार्थाचे उत्पादन करणारे उद्योग डेअरीसह 202 युनिट व त्यामधील 4871 कर्मचारी, पशु/पोल्ट्रीखाद्य उद्योग 39 व त्यामधील 375 कर्मचारी, कोल्ड स्टोअरेज/वेअर हाउस 71 युनिट व त्यामधील 550 कर्मचारी,कॉरोगेटेड बॉक्स उत्पादन करणारे 34 युनिअ व त्यामधील 310 कर्मचारी, औषधे व वैद्यकीय साधने उत्पादन करणारे 35 युनिट व त्यामधील 284 कर्मचारी, इतर- पॅकिंगशी सबंधित उद्योग 35 व त्यमधील 274 कर्मचारी, असे एकूण 416 युनिट व त्यामधील 6637 कर्मचारी यांना आत्तापर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

0000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा