रविवार, ३१ मे, २०२०

सांगली जिल्ह्यात आज सायंकाळी ७ पर्यंत दोन रुग्ण कोरोनाबाधित सद्यस्थितीत उपचाराखाली ४५ रूग्ण - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली दि. 31( जि.मा.का) :  सांगली जिल्ह्यात आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत दोन रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 45 झाली आहे. आज अखेर 63 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 112 हा रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. कोरोना बाधित रुग्णांपैकी एका रुग्णांची स्थिती चिंताजनक असून तिघांची स्थिती स्थीर आहे. आज चार रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
आज कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये मणदुर तालुका शिराळा येथील 81 वर्षाचा पुरूष आहे (मुंबई वरून त्यांची दोन मुले आलेली आहेत त्यांच्या संपर्कात आल्यामुळे). तसेच दत्त कॉलनी मिरज म.न.पा. कार्यक्षेत्रातील 67 वर्षाचा पुरूष असून सदर व्यक्ती ॲम्बुलन्स मधून दिनांक २७ मे रोजी मुंबईवरून आली होती, अशा दोघांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी औंढी तालुका जत  येथील 55 वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील 48 वर्षाच्या पुरूष रूग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. खिरवडे (शिराळा) येथील ५६ वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. मणदुर (शिराळा) येथील ८१ वर्षाच्या पुरूष रूग्णास ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरू असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे.
आटपाडी येथील २६ वर्षाचा पुरूष, सोनारसिध्द नगर (आटपाडी) येथील २२ वर्षाची महिला, जांभुळणी (आटपाडी) येथीहल ५३ वर्षाचा पुरूष, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उत्तर शिवाजी नगर येथील १५ वर्षाची मुलगी, असे चार रूग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा