मंगळवार, २ जून, २०२०

महानगरपालिका हद्दीत दत्त कॉलनी मिरज येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत दत्त कॉलनी (पूर्व), गल्ली क्रमांक 5, मालगाव रोड, मिरज परिसरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत 1) नारायण स्मृती बंगला, 2) सलिम शेख घर 3) गुरू जकाते घर 4) प्रविण साळुंखे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - महानगरपालिका क्षेत्र 1) सुश्मा शिंदे घर 2) आकाश बंगला 3) शिवराज कोतवाल घर 4) मलिकजान शेख घर.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा