गुरुवार, ४ जून, २०२०

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना शेजारील जिल्ह्यातून ये-जा करण्याच्या अनुषंगाने पास देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्राधिकृत

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यत येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी 30 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवीत असताना शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने उद्योग घटकांना परवानगी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील विविध उद्योग घटकांमध्ये सांगली जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यातून कामगार कामास आहेत. सदर कामगारांना ये-जा करण्यासाठी दैनंदिन पास देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर यांना औद्योगिक क्षेत्रातील ज्या उद्योग घटकांचे कामगार सांगली जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातून ये-जा करणार आहेत, त्या कामगारांना दैनंदिन पास देण्यासाठी प्राधिकृत केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा