बुधवार, ३ जून, २०२०

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही मिळणार लाभ - अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर


सांगली दि. 3( जि.मा.का) :  महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत कोविड-19 बाधित / अबाधित रूग्णांचा समावेश केला असून पिवळे केसरी रेशनकार्ड धारकांबरोबरच पांढऱ्या रेशनकार्ड धारकांनाही त्याचा लाभ 31 जुलै 2020 पर्यंत होणार आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय मिरज हे कोविड-19 रूग्णांसाठी घोषित केलेले असून सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली येथे इतर रूग्णांच्यावर नियमित उपचार होत असून दोन्ही रूग्णालयांमध्ये रूग्णांना योजनेचा लाभ मिळत आहे. त्यासाठी लाभार्थ्याला रहिवासी पुरावा म्हणून वैध असेलेली पिवळी, केशरी, शुभ्र शिधापत्रिका, तहसीलदार यांचा दाखला अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुराव्याचे कागदपत्र सादर करावे लागेल. शासनमान्य फोटो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लाइसेन्स इत्यादी (झेरॉक्स परवानगी फक्त कोविड पेशंटकरीता) यापैकी एक किंवा त्याची झेरॉक्स याची आवश्यकता आहे. कोविड रूग्णांची सदर कागदपत्रे त्वरीत उपलब्ध नसल्यास कमीत कमी त्याचे मोबाईल वरील सुस्पष्ठ फोटो सादर करावे. जेणेकरून सर्व रूग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळेल,असे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी कळविले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा