गुरुवार, ४ जून, २०२०

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या खात्यातील जून महिन्याची रक्कम मिळण्यासाठी वेळापत्रक जाहीर - अग्रणी जिल्हा प्रबंधक आर. पी. यादव

सांगली, दि. 04, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजनेतील महिला    खातेधारकांना एप्रिल महिन्यापासून दरमहा 500 रूपये तीन महिने मिळणार आहेत. या रक्कमेचे वाटप करताना बँकेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी जून महिन्याकरीता वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. अशी माहिती अग्रणी जिल्हा प्रबंधक आर. पी. यादव    यांनी दिली.
ज्यांच्या खात्याचे शेवटचे क्रमांक 0 व 1 आहेत त्यांना 4 जून रोजी, खात्याचे शेवटचे क्रमांक 2 व 3 आहेत त्यांना 5 जून रोजी, खात्याचे शेवटचे क्रमांक 4 व 5 आहेत त्यांना 7 जून रोजी, खात्याचे शेवटचे क्रमांक 6 व 7 आहेत त्यांना 8 जून रोजी, खात्याचे शेवटचे क्रमांक 8 व 9 आहेत त्यांना 9 जून रोजी रक्कम जमा होईल. खातेधारकांना पुढील दिवशी रक्कम काढता येईल. शक्यतो याच तारखांना बँकेत अथवा बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात येऊन व्यवहार करावेत, जेणेकरून सर्वांना सेवा देणे सोयीचे होईल. या वेळापत्रकानुसार ज्यांना रक्कम काढता येणार नाही त्यांना 11 जून नंतर बँकेच्या नियमित वेळेत रक्कम काढता येईल. तसेच वैयक्तीक अंतर राखून रांगेत उभे राहून शिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रबंधक आर. पी. यादव यांनी केले आहे.


00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा