मंगळवार, २ जून, २०२०

खानापूर तालुक्यातील करंजे गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : खानापूर तालुक्यातील करंजे गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - खानापूर तालुक्यातील करंजे येथील 1) पूर्व दिशा - अग्रणी नदी 2) पश्चिम दिशा - रामनगर रस्ता 3) दक्षिण दिशा - अग्रणी नदी 4) उत्तर दिशा - अग्रणी नदी, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) पूर्व दिशा - एकेरी मळा 2) पश्चिम दिशा - मेटकरी वस्ती 3) दक्षिण दिशा - माने वस्ती अंगणवाडी 4) उत्तर दिशा - मदने मळा.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा