मंगळवार, २ जून, २०२०

खानापूर तालुक्यातील गोरेवाडी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : खानापूर तालुक्यातील गोरेवाडी गावात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - खानापूर तालुक्यातील गोरेवाडी येथील 1) पूर्व दिशा - बलवडी शीव तानाजी तुकाराम गायकवाड यांच्या शेतापर्यंत 2) पश्चिम दिशा - एस.टी. पिक अप शेड गोरेवाडी ते खानापूरकडे जाणारा रस्ता 3) दक्षिण दिशा - लक्ष्मण जयसिंग गायकवाड यांच्या शेत जमीनी पर्यंत 4) उत्तर दिशा - शंकर काका गायकवाड यांच्या शेत जमीनीपर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) पूर्व दिशा - बलवडी शीव तानाजी तुकाराम गायकवाड यांच्या शेतापर्यंत 2) पश्चिम दिशा - रामचंद्र बाबा शेळके यांच्या शेतजमीनीपर्यंत जाधवाडी गोरेवाडी शीव 3) दक्षिण दिशा - काका सुबराव भगत यांच्या शेत जमीनीपर्यंत 4) उत्तर दिशा - धोंडीराम पांडुरंग वत्रे यांच्या शेत जमीनीपर्यंत.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा