मंगळवार, १६ जून, २०२०

महानगरपालिका क्षेत्रात लक्ष्मीनगर, सांगली येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात लक्ष्मीनगर, सांगली हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आले होते. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रातील शेवटची पॉझीटीव्ह केस दिनांक 16 मे 2020 रोजी निदर्शनास आली होती. तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. सदर झोनचे 28 दिवस दिनांक 14 जून 2020 रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे लक्ष्मीनगर, सांगली येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दि. 14 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा