गुरुवार, ४ जून, २०२०

शिराळा तालुक्यातील रिळे गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : शिराळा तालुक्यातील मौजे रिळे येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - शिराळा तालुक्यातील मौजे रिळे येथील (200 मीटर) 1) जि.प. प्राथमिक शाळा रिळे ते रंगराव महादेव पाटील यांचे घर 2) रंगराव महादेव पाटील यांचे घर ते रघुनाथ तुकाराम बंडगर यांचे शेत 3) रघुनाथ तुकाराम बंडगर यांचे शेत ते रघुनाथ ज्ञानू चौगुले यांचे शेत 4) रघुनाथ ज्ञानू चौगुले यांचे शेत जि. प. प्राथमिक शाळा रिळे, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) फुफिरे फाटा शिव ते रिळे रिंगीचा ओढा 2) रिळे रिंगीचा ओढा ते अस्वलेवाडी शिव 3) अस्वलेवाडी शिव ते अस्वलेवाडी ओढा 4) अस्वलेवाडी ओढा ते फुफीरे फाटा शिव.
या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा