गुरुवार, ४ जून, २०२०

सांगली जिल्ह्यात आजअखेर 73 रूग्ण कोरोनामुक्त सद्यस्थितीत उपचाराखाली 51 रूग्ण - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 4( जि.मा.का) :  सांगली जिल्ह्यात आज दुपारी 1 वाजेपर्यंत चार रुग्ण कोरोणाबाधित झाले असून 3 रूग्ण कोरानामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आज अखेर 73 रुग्ण कोरोणामुक्त झाले असून उपचाराखालील रुग्णांची संख्या 51 झाली आहे. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 128 रुग्ण कोरोणाबाधित ठरले आहेत. उपचाराखाली असलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी पाच रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
आज कोरोना बाधित झालेल्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील पॉझीटीव्ह रूग्णाच्या घरातील दोन मुले वय वर्षे 19 व 18 पॉझिटीव्ह आली आहेत. मुंबईवरून आलेला खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील 60 वर्षाचा पुरूष तसेच आटपाडी तालुक्यातील      झरे येथील पॉझीटीव्ह रूग्णाच्या घरातील 5 वर्षाचा मुलगा पॉझिटीव्ह आले आहेत. तर आज कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये शिराळा तालुक्यातील माहरे येथील 70 वर्षाचा पुरूष, वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथील 37 वर्षाचा पुरूष व आटपाडी तालुक्यातील कामत येथील 65 वर्षाचा पुरूष, असे तीन रूग्ण आज कोरानामुक्त झाले आहेत. आजअखेर ग्रामीण भागातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या 88 असून शहरी भागातील 29 तर महानगरपालिका क्षेत्रातील पॉझीटीव्ह रूग्णांची संख्या 11 इतकी आहे.
पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथील आज पॉझीटीव्ह आलेला 60 वर्षाचा पुरूष नॉनइन्व्हेजीव व्हेंन्टिलेटरवर ठेवण्यात आला आहे. औंढी तालुका जत  येथील 55 वर्षीय पुरुष सद्यस्थितीत इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेला असून सदर रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. कडेबिसरी (सांगोला, सोलापूर) येथील 48 वर्षाच्या पुरूष रूग्णाला ऑक्सिजनवर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. खिरवडे (शिराळा) येथील 56 वर्षाच्या पुरूष रूग्णावर सद्यस्थितीत नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटर उपचार अद्याप सुरूच असून सदर रूग्णाची स्थिती स्थीर आहे. मणदुर (शिराळा) येथील 81 वर्षाच्या पुरूष रूग्णास नॉन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला असून रूग्णाची स्थिती स्थीर आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा