शुक्रवार, ५ जून, २०२०

सांगली जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांची संख्या 1 लाख 40 हजाराहून अधिक तर जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या 55 हजाराहून अधिक

सांगली, दि. 5 (जि. मा. का.) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार दिनांक 4 जून पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर   अन्य जिल्ह्यात  जाणाऱ्यांची संख्या 1 लाख 40 हजार 691 इतकी असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून राज्यातील अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या 55 हजार 906 इतकी आहे. अशा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 1 लाख 96 हजार 596 इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली.
यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या 37 हजार 492 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या 1 लाख 3 हजार 199 व्यक्ती आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून येणाऱ्या 12 हजार 444 व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या 43 हजार 462 व्यक्तींचा समावेश आहे.  
000000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा