शनिवार, २० जून, २०२०

खाजगी रूग्णालयांनी शासन अधिसुचनेतील नमूद दरानुसारच शस्त्रक्रिया व उपचारासाठी आलेला खर्च आकारावा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : सद्या कोरोना (कोविड-19) विषाणूची साथ रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 ची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दि. 21 मे 220 च्या पत्रान्वये जाहीर केलेल्या अधिसुचनेनुसार खाजगी रूग्णालयात कोविड-19 इतर रोगांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रीया उपचार यावर आकारण्यात येणारे रूग्ण उपचार दर निश्चित करण्यात आलेले आहेत. यानुसार सर्व खाजगी रूग्णालयांनी त्यांच्या रूग्णालयामध्ये असणाऱ्या खाटांच्या संख्येच्या 80 टक्के आंतररूग्णांवर (80 टक्के खाटांवरील) सुचनेमध्ये नमूद केलेल्या दराने शस्त्रक्रीया उपचार यावर आलेला खर्च आकारणेचा आहे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
शासनाच्या सदर सुचनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खाजगी रूग्णालयात रूग्ण उपचार नियंत्रित दरापेक्षा जास्त / अवाजवी शुल्क आकारण्याबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खाजगी रूग्णालयामध्ये आकारण्यात येणाऱ्या खर्चाच्या बिलासंदर्भात कोणाची तक्रार असल्यास तक्रार निवारण समिती सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक सांगली, कोरोना नियंत्रण कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली येथे किंवा हेल्पलाईन नंबर 0233-2373032 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा