गुरुवार, ४ जून, २०२०

जिल्ह्यात सोयाबीन उगवण चाचणीची 1200 हून अधिक प्रात्यक्षिके

 सांगली दि. 4( जि.मा.का) : खरीप हंगामाच्या पाश्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कृषि विभागाकडून सोयाबीन बियाणे उगवण चाचणीची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत सोयाबीनची पेरणी करणाऱ्या गावात ं1 हजार 234 सोयाबीन बियाणांची उगवण चाचणीची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. या चाचणीनुसार सरासरी उगवण क्षमता 73 टक्के आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.

तालुकानिहाय घेण्यात आलेल्या सोयाबीन बियाणांची उगवण चाचणी प्रात्यक्षिकांची व कंसात उगवण टक्केवारीची आकडेवारी पुढीलप्रमाणे. कडेगाव 150 (72), तासगाव  128 (80), विटा 47 (70), पलूस 310 (82), कवठेमहांकाळ 3 (67), शिराळा 55 (70), मिरज 181 (68), वाळवा 360 (76.66).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा