मंगळवार, १६ जून, २०२०

मिरज तालुक्यातील सोनी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील मौजे सोनी हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - मिरज तालुक्यातील मौजे सोनी येथील 1) नामदेव भगवान पाटील घरासमोरील रस्ता 2) रामकृष्ण विष्णू जाधव दक्षिण बाजू 3) विलास केशव पाटील घराचे पश्चिम बाजू 4) दादासो शामराव पठाणे घरापर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) दक्षिण बाजू ओढा पात्र 2) पश्चिम बाजू कुमठे रस्ता जितेंद्र शंकर ढोबळे घर 3) उत्तर बाजू निरंजन शिवाजी पाटील द्राक्ष बाग 4) सोनी करोली रस्ता पश्चिमबाजू.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा