मंगळवार, २ जून, २०२०

जत तालुक्यातील आवंढी गावात कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जत तालुक्यातील आवंढी गावाच्या हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - 1) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या उत्तरेकडे आवंढी लोहगाव रस्त्यावरील वामन काशिद यांच्या घरापर्यंत 2) आवंढी गावामधील ईशान्य दिशेला सरकारी फॉरेस्ट बैल पठारपर्यंत 3) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या पूर्वेकडे सरकारी फॉरेस्ट कस्तुरी पठारपर्यंत 4) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या आग्नेय दिशेला राजाराम धोंडीराम कोडग यांच्या शेतापर्यंत 5) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या दक्षिणेकडे आवंढी सोनंद रस्त्यावरील तुकाराम यशवंत कोडग यांच्या विहीरीपर्यंत 6) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या नैऋत्येकडे गुंडीराम सोपान कोडग यांच्या घरापर्यंत 7) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या पश्चिमेकडे औंढ ओढ्यालगत मनोहर विठ्ठल कोडग यांच्या घरापर्यंत 8) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या वायव्य दिशेला धोंडीराम विठोबा कोडग यांच्या शेतापर्यंत, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या उत्तरेकडे आवंढी लोहगाव रस्त्यावरील रावसाहेब निवत्ती भोसले यांच्या शेतापर्यत 2) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या ईशान्य दिशेला सरकारी फॉरेस्ट बैल पठारपर्यंत 3) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या पूर्वेकडे सरकारी फॉरेस्ट कस्तुरी पठारपर्यंत 4) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या आग्नेय दिशेला अंकुश केरू माने यांच्या शेतापर्यंत 5) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या दक्षिणेकडे आवंढी अंत्राळ रस्त्यावरील ज्ञानू शंकर गेजगे यांच्या घाटावरील शेतापर्यंत 6) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या नैऋत्येकडे आवंढी शेगाव रस्त्यावरील महादेव गणपती देशमुख यांच्या शेतापर्यंत 7) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या पश्चिमेकडे आवंढी लक्ष्मीनगर सिंगनहळ्ळी रस्त्यावरील माणिक नारायण कोडग यांच्या शेतापर्यंत 8) आवंढी गावामधील शिवाजीनगरच्या वायव्य दिशेला आवंढी सोनंद रस्त्यावरील धनाजी महादेव सोळगे (सोळगेवाडी) यांच्या शेतापर्यंत.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा