गुरुवार, ४ जून, २०२०

गुलमोहर कॉलनी सांगली येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका गुलमोहर कॉलनी सांगली हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रातील शेवटची पॉझीटीव्ह केस दिनांक 8 मे 2020 रोजी निदर्शनास आली होती. तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. या झोनचे 28 दिवस दिनांक 4 जून 2020 रोजी मध्यरात्री होत आहेत. त्यामुळे गुलमोहर कॉलनी सांगली येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी दिनांक 5 जून 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा