सोमवार, १५ जून, २०२०

अनाधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका - शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनंदा वाखारे

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील काही खाजगी प्राथमिक शाळा शासन निर्णय प्रमाणे परवानगी न घेता तसेच अटी व शर्तीची पुर्तता न करता अनाधिकृतपणे चालू असल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार सन 2017-18 मधील युडीआयएसई नुसार अनाधिकृत म्हणून नोंद असलेल्या द बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कुल सांगली क्रमांक 01 व द बुध्दीष्ट इंटरनॅशनल स्कुल सांगली क्रमांक -2 या दोन शाळांना अनाधिकृत शाळा म्हणून घोषित केले आहे. या शाळांना यापूर्वी शाळा बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. या शाळांमध्ये चालु शैक्षणिक वर्षात पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनंदा वाखारे यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा