मंगळवार, १६ जून, २०२०

मिरज तालुक्यातील बुधगाव येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील मौजे बुधगाव हद्दीत कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - मिरज तालुक्यातील मौजे बुधगाव येथील 1) एस.टी.स्टँड ते रामकृष्ण हॉटेल तासगाव रस्ता पश्चिम बाजू 2) रामकृष्ण हॉटेल ते पाण्याची टाकी पुर्व बाजू 3) पाण्याची टाकी भिकू पवार घर दक्षिण भाग 4) भिकू पवार घर ते मधू यादव घर 5) मधू यादव घर ते एस. टी. स्टँड, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे.
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) पिव्हीपीआयटी चक्कर सडकेने नायकवडी ट्रान्सपोर्ट पर्यंत 2) नायकवडी ट्रान्सपोर्ट ते आदर्श शाळा पर्यंत 3) आदर्श शाळा ते महादेव मंदिर 4) महादेव मंदिर ते सरकारी दवाखाना 5) सरकारी दवाखाना ते वनवासवाडी सार्वजनिक शौचालय 6) वनवासवाडी सार्वजनिक शौचालय ते पिव्हीपीआयटी कॉलेज.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा