मंगळवार, २ जून, २०२०

मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यातील कर्नाळ हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आला होता. कोविड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदर क्षेत्रामध्ये तातडीची प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कंटेनमेंट झोन बफर झोन अधिसूचित करण्यात आले होते. सदर बाधित क्षेत्रातील शेवटची पॉझीटीव्ह केस दिनांक 3 मे 2020 रोजी निदर्शनास आली होती. तदनंतर एकही नवीन रूग्ण आढळून आला नाही. या झोनचे 28 दिवस दिनांक 31 मे 2020 रोजी पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील कंटेनमेंट झोनची अधिसूचना रद्द करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिनांक 1 जून रोजी जारी केली असून या अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा